Why Join Us

shape
About

सभासद होण्याचे फायदे

200 पेक्षा जास्त व्यावसायिकांचा मजबूत कनेक्ट — सीए, डॉक्टर, वकील यांसारखे विविध क्षेत्रातील अनुभवी प्रोफेशनल्स यामध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन, टेक्सटाईल, फूड, हेल्थकेअर, शिक्षण, टेक्नॉलॉजी तसेच सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत उद्योजक व व्यावसायिकांशी थेट गाठीभेटी घडतात.

महिन्यातून एकदा सायंकाळी आयोजित डिनर मीटिंग्स दरम्यान सभासदांना स्वतःचा व्यवसाय, उत्पादने व सेवा सादर करण्याची संधी मिळते. यामुळे नव्या व्यावसायिक संधी निर्माण होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळते.

यशस्वी उद्योजक, उद्योगतज्ज्ञ व मार्गदर्शकांचे अनुभवाधारित मार्गदर्शन सभासदांच्या व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. व्यवसाय वाढ, ब्रँडिंग, नेटवर्किंग व नेतृत्व कौशल्ये यावर सखोल मार्गदर्शन केले जाते.

Connect Biz उपक्रमाच्या अंतर्गत मोठ्या उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते, ज्यामुळे व्यवसाय विस्तार, नवीन भागीदारी आणि दीर्घकालीन व्यावसायिक संबंध निर्माण होतात. एकूणच, हा मंच प्रत्येक सभासदाच्या व्यवसायिक यशासाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह आधारस्तंभ ठरतो.

shapes