ब्राह्मण बिझनेस फोरम नेहमीच आपल्या ब्राह्मण व्यवसायिकांसाठी विविध उपक्रम आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करत आलेला आहे. व्यवसाय वृद्धीसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि सभासदांना व्यवसायिक मार्गदर्शन उपलब्ध करणे हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की, International Women's Day 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बीबीएफ मधील महिला उद्योजकांनी, बीबीएफ मधील महिला व्यवसायिकांसाठी एक विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला आहे.
दिनांक : शनिवार, 7 मार्च 2026
वेळ : संध्याकाळी 6.00 ते 9.00
स्थळ : हॉटेल अयोध्या
सातारा येथील सुप्रसिद्ध निसर्ग हर्ब्स आयुर्वेदिक औषध कंपनी च्या महिला उद्योजिका
डॉक्टर सौ आरती सोमण , यांना आपण आमंत्रित केलेले आहे. त्यांचा व्यवसायामधील उद्योग उभारणीचा अनुभव आणि इतर व्यवसायिक कौशल्य निश्चितच आपल्या व्यवसायिकांना उपयुक्त ठरेल याबद्दल तिळमात्र शंका नाही.
तसेच सध्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ब्राह्मण समाजाच्या दोन नगरसेविका
१) सौ दीपा अजित ठाणेकर
२) सौ नेहा अभय तेंडुलकर
या निवडून आलेल्या आहेत. त्यांना आपण या कार्यक्रमांमध्ये सन्मानित करणार आहोत.